BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चार वर्षाच्या बालकावर बिबट्याचा हल्ला

 


 शिराळा,ता.६:गिरजवडे पैकी मुळीकवाडी (ता.शिराळा) येथे आजोबा सोबत शेतात गेलेल्या आरव अमोल मुळीक या चार वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले.मात्र काशिनाथ मुळीक यांनी आपल्या जीवाची परवा न करता उसात फरफटत नेलेल्या आरवची बिबट्या पासून सुटका करून त्यास मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले.त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना आज सोमवारी (ता. ६) रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास  घडली.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, बजरंग मुळीक हे आपला नातू आरव सोबत गाडीमळ्या  शेजारी असणाऱ्या पाचिरोपाडा येथे जनावरांसाठी उसाचा पाला व गवत  आणण्यासाठी गेले होते.त्यावेळी त्यांच्या सोबत शोभा मुळीक, राजश्री मुळीक होत्या. गवत  व उसाचा पाला काढण्याचे  काम सुरु होते. बजरंग यांच्या शेजारी असणाऱ्या आरव वर  अचानक झाडाच्या आडोशाला दबा धरून बसलेल्या  बिबट्याने क्षणात  झडप घालून मानेस पकडून त्यास उसाच्या शेतात फरपटत नेले. त्यावेळी  आरव कुठे दिसत नसल्याचे पाहून बजरंग यांनी  काशिनाथ मुळीक यांना आरव कुठे दिसत नाही म्हणून फोन केला. सर्वांनी उसात त्याचा शोध सुरु केला.त्यावेळी  काशिनाथ यांना बिबट्याने आरवला उसात नेल्याचे दिसताच त्यांनी प्रसंगावधान राखून आपल्या जीवाची परवा न करता बिबट्याच्या मागे धावत उसात जाऊन त्याची  सुटका केली.त्या ठिकाणी असणऱ्या लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. जातात जाता काशिनाथ यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न  बिबट्याने केला होता.त्यानंतर आजोबा बजरंग मुळीक आणि मोहन मुळीक यांनी आरवला जखमी अवस्थेत मोटरसायकल वरून  उपचारांसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती सरपंच सचिन देसाई यांनी वनविभागाला दिली.यावेळी  वनक्षेत्रपाल  एकनाथ पारधी, वनपाल अनिल वाजे,वनरक्षक  स्वाती कोकरे,प्राणीमित्र प्रा.सुशीलकुमार गायकवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.डॉ अनिरूद्ध काकडे,डॉ मनोज महिंद यांनी प्राथमिक उपचार करून त्यास  पुढील उपचारासाठी कराड येथे कृष्णा हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे.आमदार सत्यजित देशमुख यांनी कराड येथे त्वरित उपचार करण्याची सूचना सबंधित डॉक्टरांना केली.यावेळी  भाजपचे तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन आरव ची विचारपूस केली. यावेळी गिरजवडे चे सरपंच सचिन देसाई,आनंदा मोंडे,सुखदेव मुळीक,महेश मुळीक,प्रशांत पाटील उपस्थित होते. 

 

काही वेळातच त्याच बिबट्याने घागरेवाडी येथील विक्रम खोचरे यांच्या घराच्या बांधकाम कामावर असणाऱ्या योगेश कुरणे, भरत नायकल, सुजित शिरतोडे(सर्व रा.पेठ)या कामगारांच्या दुचाकीवर  झडप घातली. परंतु सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले. या परिसरात बिबट्याचा वावर कायम असून आज सकाळी काही लोकांना बिबट्याचे दर्शन झाले होते.


आपल्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच आरवचे वडील अमोल मुळीक यांनी उपजिल्हा रुग्णालयात  धाव घेतली.त्या ठिकाणी आपल्या मुलाला जखमी अवस्थेत पाहून त्यांचा अश्रूचा बांध फुटला. नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.


 आरवच्या गळ्यावर, छातीवर बिबट्याने १७ ठिकाणी ओरबडले आहे.त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी कराड येथे पाठवण्यात आले आहे.

डॉ.अनिरुद्ध काकडे (वैद्यकीय अधिकारी ,उपजिल्हा रुग्णालय) 


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



 

Post a Comment

0 Comments